मलिकांना धक्का : वक्फ बोर्डाच्या ठिकाणांवर ईडीचे छापे
नवाब मलिकराजकीय

मलिकांना धक्का : वक्फ बोर्डाच्या ठिकाणांवर ईडीचे छापे

पुणे | Pune

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी (Waqf Board) संबंधित पुणे घोटाळ्याची चौकशी ईडीने (ED) सुरू केली आहे...

याप्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण ७ ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे (Raid) टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सध्या मुंबई ड्रग्स प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ तापले असताना आता मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे (Pune) घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे.

वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाही आहेत. ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट, तालुका मुळशी याची वक्फ बोर्ड अंतर्गत नोंद आहे. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शकपणे सुरू आहे. काही वृत्तानुसार ईडी नवाब मलिकांच्या घरापर्यंत येईल, असे ऐकले. ईडी माझ्या घरापर्यंत आली तर त्यांचे मी स्वागत करेन. मात्र जी छापेमारी सुरू आहे ती ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्टवर आहे.

नवाब मलिक, अल्पसंख्यांक मंत्री

Related Stories

No stories found.