Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशDelhi Excise Policy case : ED कडून दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापेमारी

Delhi Excise Policy case : ED कडून दिल्लीसह देशभरात ३० ठिकाणी छापेमारी

दिल्ली | Delhi

दिल्ली सरकारच्या (Delhi Government) उत्पादन शुल्क विभागाशी (Excise Department) संबंधित प्रकरण ताब्यात घेतल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयानं (ED) आज (मंगळवार) सकाळी मोठी कारवाई करत 30 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत.

- Advertisement -

ईडीने दिल्लीशिवाय गुरुग्राम, लखनऊ, हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरू येथे छापे टाकले आहेत. मद्यविक्रेते हे तपास यंत्रणेच्या निशाण्यावर आहेत. ईडीच्या छाप्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घराचा समावेश नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचं पथकं दिल्लीतील जोरबागमध्येही पोहोचली आहे. समीर महेंद्रूच्या मालमत्तांवर ईडीनं छापा टाकला आहे. समीर हे मेसर्स इंडो स्प्रिट्सचे MD आहेत. त्यांनी मेसर्स राधा इंडस्ट्रीजच्या राजेंद्र प्लेस येथील युको बँकेच्या खात्यात एक कोटी रुपये ट्रान्सफर केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या