महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात ईडीने (ED) विविध ठिकाणी छापे टाकत मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक (financial fraud) आणि गैरव्यवहार करणाऱ्यांचे धाबे आणखी दणाणले आहेत...

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी
पाण्याच्या टाकीत पडल्याने दीड वर्षीय बालिका दगावली

ईडीने नागपुर आणि मुंबईसह तब्बल १५ ठिकाणी छापे टाकत ही कारवाई केली असून या छापेमारीत ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाई संबधी ट्विट करत ईडीने (Directorate of Enforcement) ही माहिती दिली असून पुढील तपास सुरू असल्याचे देखील सांगितले आहे.

महाराष्ट्रात ईडीची मोठी कारवाई; १५ ठिकाणी छापेमारी
ज्येष्ठ पत्रकार वि.वि.करमरकर यांचे निधन

दरम्यान, या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये डोळे दिपवणारी रोकड, दागिने (jewelry) यांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com