शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची ईडीकडून चौकशी

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची ईडीकडून चौकशी

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)रडारवर शिवसेनेचा (Shiv sena)आणखी एक नेता आला. शिवसेना नेते रवींद्र वायकर (ravindra vaykar)यांची ८ तास चौकशी करण्यात आली. तसेच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकते, असेही ईडीच्या (ED)सूत्रांकडून सांगण्यात आले. आपण ई़डीच्या चौकशीला संपुर्ण सहकार्य केल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले.

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची ईडीकडून चौकशी
कॅटरिनाने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहते शोधताय विकीचे नाव

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. आता त्यात वायकर यांच्या नावाची भर पडली. ते जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत.

किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. दरम्यान, वायकर यांना नेमकं कोणत्या प्रकरणातील चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, हे अद्याप सांगण्यात आले नाही. तर, वायकर यांनीही ईडीच्या चौकशीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com