राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

एकीकडे आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येणार असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आयएल आणि एफएस (IL & FS) या कंपनीच्या व्यवहाराप्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठविल्याचे बोलले जात आहे. आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Satta Sangharsh : आम्हाला खात्री, लोकशाहीची हत्या...; संजय राऊतांची प्रतिक्रिया

याआधीही या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकऱणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांना ईडीने (ED) नोटीस पाठवल्याने राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. जयंत पाटील यांना ईडीची नोटीस बजावण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांना धक्का बसला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com