Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याआता ईडीचे टार्गेट ममता बॅनर्जी; काय आहे प्रकरण?

आता ईडीचे टार्गेट ममता बॅनर्जी; काय आहे प्रकरण?

कोलकाता | Kolkata

गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या (ED) कारवायांची चर्चा संपूर्ण देशभरात होत आहे. भाजप (BJP) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे….

- Advertisement -

आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे नातेवाईक (Mamata Banerjee) ईडीच्या रडारवर आहेत. त्यांचे भाचे आणि तृणमूल पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आणि त्यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी (Rujira Banerjee) यांना ईडीने समन्स (Summons) बजावले आहे.

ईडीने बॅनर्जी दाम्पत्याला कोळसा घोटाळ्याबाबत (Coal scam) चौकशीसाठी हे समन्स बजावले आहे. त्यांना पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी देल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ईडीने बॅनर्जी दाम्पत्याची अनेकदा चौकशी केली आहे.

कोळसा घोटाळा काय?

सीबीआयच्या कोलकाता ॲन्टी करप्शन ब्रांचने २७ नोव्हेंबर २०२० रोजी पश्चिम बंगालमधील काही भागांत अवैध उत्खननाबाबत गुन्हा नोंदवला. या उत्खननाची जबाबदारी कोल इंडिया लिमिटेडच्या अखत्यारित येणाऱ्या ईसीएल या कंपनीला दिली गेली होती.

याबाबत तपासात ईसीएलच्या एका टीमला आढळले की, व्यापक पद्धतीने अवैधरित्या कोळशाचे उत्खनन सुरु आहे. त्यानंतर, त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर कोळसा जप्त करण्यात आला. नोव्हेंबर २०२० मध्ये सीबीआयने ईसीसएलच्या अनेक अधिकाऱ्यांसहित रेल्वे आणि सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या