Jayant Patil : जयंत पाटलांना पुन्हा ईडीचे समन्स

Jayant Patil : जयंत पाटलांना पुन्हा ईडीचे समन्स

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मागे ईडीचं सत्र सुरू झालं आहे. २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता...

माहिती मिळाल्यानुसार, २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना ईडीकडून (ED) जयंत पाटलांना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. कथित IL and FS घोटाळ्या प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना ‘आयएल अँड एफएस’ प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी ‘कमिशन रक्कम’ दिल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Jayant Patil : जयंत पाटलांना पुन्हा ईडीचे समन्स
पोहण्याचा मोह जीवावर बेतला, खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या...

ईडीने या अगोदर समन्स बजावत जयंत पाटील यांना चौकशीसाठी आज (15 मे) हजर राहण्याचे आदेश नोटीसीमधून देण्यात आले होते. मात्र जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत मागितली होती.

Jayant Patil : जयंत पाटलांना पुन्हा ईडीचे समन्स
VIDEO : शेवगाव येथे संभाजी महाराज मिरवणुकीत दगडफेक, ४ पोलीस जखमी

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली असतनाही मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. याआधी या कंपनीप्रकरणी राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती.

जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले जातील.

मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या 'आयएल अँड एफएस' कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया काल माध्यमांना दिली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com