Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला ED चा आणखी एक दणका; प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५...

शिवसेनेला ED चा आणखी एक दणका; प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांची संपत्ती जप्त

मुंबई | Mumbai

शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक पुन्हा एकदा सक्तवसुली संचालनलायाच्या (ED) रडारवर आले असून….

- Advertisement -

NSEL घोटाळा प्रकरणी ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत ईडीने प्रताप सरनाईकांची ११.३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

NSEL घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्याचा ईडीने प्रयत्न केला होता. मात्र, याच प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची ठाण्यातील ११ कोटी ३६ लाखाची संपत्ती जप्त केली आहे. यात ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे. या जमिनींची किंमत एवढी असल्याचं सांगितलं जात आहे.

आश्चर्यकारक! एकाच अपघातात ‘त्या’ने दोन वेळा मृत्यूला दिला चकवा, पाहा VIDEO

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. यामध्ये नेत्यांचे नातेवाईक, त्यांच्याशी संबंधीत कंपन्या आणि इतर मालमत्तांची चौकशी केली जातेय. ईडीने २२ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर कारवाई केली आहे. ईडीने ठाकरेंच्या मेहुण्याची ६ कोटींपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

‘नीलांबरी’ प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी लाँडरींगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच मालमत्तेवर ईडीने कारवाई झाली आहे. त्यानंतर आता सरनाईक यांच्या मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स… काय आहे प्रकरण?

प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांची राजकीय कारकीर्द ठाण्यातून सुरू झाली. १९९७ साली ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले. ते सलग दोनदा नगरसेवक राहिले आहेत. या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जोडलेले होते. २००८ साली प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. २००९ साली माजिवडा-ओवळा या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग २०१४ आणि २०१९ मध्ये देखील ते आमदार म्हणून निवडून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या