Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअनिल देशमुख यांच्या विरोधात आता ईडीकडून गुन्हा दाखल

अनिल देशमुख यांच्या विरोधात आता ईडीकडून गुन्हा दाखल

मुंबई :

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात आता सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या वसुलीचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

नाशिक लॉकडाऊन : पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी सकाळपासून लागल्या रांगा

अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे लवकरच अनिल देशमुख यांची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ईडी तपास सुरु करण्यापूर्वी एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट म्हणजे ECIR दाखल केला आहे. एखाद्या गुन्ह्यात चौकशी सुरु करण्यापूर्वी जसे पोलिस प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवतात, त्याच प्रकारे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची माहिती मिळताच ईडी ईसीआयआर नोंदवते. त्यामुळे अनिल देशमुख यांची आता ईडीकडून चौकशी सुरु होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या