ई़डी चौकशी :एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार

ई़डी चौकशी :एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार
एकनाथ खडसेराजकीय

मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गुरुवारी खडसे यांची ईडी (ED) कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी झाली. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (mandakini khadse) यांनाही ईडीने समन्स बजावले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे.

एकनाथ खडसे
बीएचआर पतसंस्था घोटाळा : अटकेच्या भितीने 'त्या' उद्योजकाने ठेवीदारांचे १ कोटी रुपये केले परत

पुण्यातील भोसरी MIDC जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना दोन दिवसांपुर्वी अटक झाली होती. त्यानंतर गुरुवारी खडसेंची चौकशी करण्यात आली. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात दिले होते. मात्र त्यांनी 14 दिवसांची वेळ मागितली आहे. मात्र ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याचं समजतं आहे.

एकनाथ खडसेंची 9 तास चौकशी

भोसरी जमीन घोडाळा (Bhosari Land Scam) प्रकरणात एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी एकनाथ खडसे ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. तब्बल नऊ तासांनंतर खडसे ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कन्याही उपस्थित होत्या. दरम्यान, ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं.

खडसे यांच्या वकिलांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली. आम्ही ईडीला सर्वप्रकारे सहकार्य केलं, ईडीने मागितलेली सर्व कागदपत्र दिली, काही कागदपत्र देण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांच्या वकिलांनी दिली. तसंच चौकशीला सहकार्य करण्याचं आश्वासन खडसे यांनी दिल्याचंही वकिलांनी सांगितलं.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com