Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री ED च्या कचाट्यात, बेड्या पडताच ढसाढसा रडले......

Video : तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री ED च्या कचाट्यात, बेड्या पडताच ढसाढसा रडले… नेमकं प्रकरण काय?

दिल्ली | Delhi

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कारण स्टॅलिन यांच्या मंत्रिमंडळातील ऊर्जामंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना ईडीकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून ईडीकडून सेंथिल बालाजी यांची चौकशी सुरू होती, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आल्यानंतर तामिळनाडूत मोठं राजकीय वादंग माजलं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहे. ईडीने सेंथिल बालाजी यांना अटक केल्यानंतर त्यांना अचानक रडू कोसळलं, प्रकृती खराब झाल्यानंतर समर्थकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आहे.

आळंदीत नेमकं काय घडलं? आणखी एक VIDEO आला समोर

रुग्णालयात घेऊन जात असताना मंत्री बालाजी रडत असताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंत्री आजारी असल्याची माहिती मिळताच डीएमकेच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. त्याचसोबत त्यांनी ईडीच्या या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. डीएमकेच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, ‘बालाजीची अवस्था पाहून असे वाटत होते की ईडीने त्यांना टॉर्चर केले होते.’

Monsoon Update : आला रे आला…! अखेर महाराष्ट्रात मान्सून दाखल

ईडीच्या कारवाईनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन संतप्त झाले असून, त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यांच्याशी राजकीय सूत जुळले जात नाही त्यांना मागच्या दाराने धमकावण्याचे भाजपचे राजकारण यशस्वी होणार नाही. बालाजी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने केलेली असून, त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी म्हटलं.

Biporjoy Cyclone : गणपतीपुळे किनाऱ्यावर येथे लाटांचे रौद्र रूप, पाहा धडकी भरवणारा VIDEO

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी देखील या छाप्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. आम्ही तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या