Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशIAS अधिकारी पूजा सिंघल यांना ED कडून अटक; काय आहे प्रकरण?

IAS अधिकारी पूजा सिंघल यांना ED कडून अटक; काय आहे प्रकरण?

दिल्ली | Delhi

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत IAS अधिकारी पूजा सिंघल (Pooja Singhal) यांना अटक केली आहे. अनेक तासांच्या चौकशीनंतर EDने त्यांना अटक केलीय.

- Advertisement -

मनरेगा घोटाळा (MGNREGA funds) आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering case) EDने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी EDने पूजा सिंघलच्या जवळच्या नातेवाईकांच्या रांची आणि इतर ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यादरम्यान ईडीला 19 कोटींहून अधिक रोख रक्कम आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे सापडले आहेत.

बघा नजरेतून वाचता आलं तर…! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

पूजा सिंघल या २००० च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या खनिकर्म आणि उद्योग मंत्रालयाच्या सचिव म्हणून काम करत आहेत. पूजा सिंघल झारखंड राज्य खाण विकास महामंडळाच्या अध्यक्षा आहेत. भाजप सरकारच्या काळात त्या कृषी सचिव म्हणून काम करत होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या