
मुंबई | Mumbai
क्रिकेट बुकी आणि हवाला ऑपरेटर अनिल जयसिंघानी याला अंमलबजावणी संचालनालयाच्या अहमदाबाद युनिटने १०,००० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली.
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या कथित लाच प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातही अनिल जयसिंघानी हा सहआरोपी असून त्याला आता अहमदाबादमधील ईडी युनिटने अटक केली आहे.
जयसिंघानी हा सट्टेबाज मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो १५ हून अधिक प्रकरणांमध्ये आरोपी आहे. तथापी, सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या खंडणी आणि लाचखोरीच्या प्रकरणात त्याच्या अटकेला आव्हान देणारी बुकी अनिल जयसिंघानीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.