प्रफुल्ल पटेलांविरोधात ईडीची मोठी कारवाई

प्रफुल्ल पटेलांविरोधात ईडीची मोठी कारवाई

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याविरोधात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील (Mumbai) घरावर जप्तीची कारवाई केली आहे...

याआधी प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून (ED) दोनदा चौकशी झाली आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे.

ईडीला पटेल यांच्या संपत्तीच्या (Property) व्यवहाराच्या नोदींविषयी अनियमितता आढळली होती. यामुळे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.

प्रफुल्ल पटेलांविरोधात ईडीची मोठी कारवाई
गुडन्यूज! डॉ.भारती पवारांचे नाशिककरांना ४० कोटींचे जम्बो गिफ्ट

अंडरवर्ल्डचा डॉन इक्बाल मिर्ची याच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली होती. हवाई क्षेत्रातील एव्हीएशन डिलमध्ये दीपक सलवारचा सहभाग असल्याचे समोर आले होते. संशियत व्यवहाराबाबत प्रफुल्ल पटेल यांना 6 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेले आर्थिक व्यवहार समोर आले होते.

प्रफुल्ल पटेलांविरोधात ईडीची मोठी कारवाई
...अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटीसी इमारत होती. ती इमारत गँगस्टार इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. ती इमारत प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने पुनर्विकासित केल्याची माहिती समोर आली होती.

प्रफुल्ल पटेलांविरोधात ईडीची मोठी कारवाई
जे गेले ते गद्दार, शिवसैनिक नव्हेच; आदित्य ठाकरे बंडखोरांवर बरसले

इमारतीच्या जागेच्या मोबदल्यात पटेल यांच्या कंपनीकडून इक्बाल मिर्ची आणि त्याच्या नातेवाईकांना जागा आणि पैसे दिल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी केली गेली. आज ईडीने त्यांच्या सीजे हाऊसमधील घरावर जप्तीची कारवाई केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com