Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याद्राक्ष पंढरीत जेव्हा स्ट्रॉबेरी बनते शेतकऱ्याचा आधार

द्राक्ष पंढरीत जेव्हा स्ट्रॉबेरी बनते शेतकऱ्याचा आधार

लखमापूर । वार्ताहर Lakhmapur

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) काही भागांतील पिके, फळे, रानभाज्या आदी जिल्ह्यातील जनतेचे आकर्षण बनल्या आहे. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील लालबुंद स्ट्रॉबेरी (Strawberry) आता येणार्‍या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्ट्रॉबेरीने आदिवासी भागातील (tribal area) जनतेला व शेतकर्‍यांना (farmers) आर्थिक आधार (financial support) दिला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील काही भागात थंडीच्या हंगामात (winter season) स्ट्रॉबेरीचे पिक (Strawberry crop) मोठ्या प्रमाणांवर घेतले जात असल्याने या पिकांला चांगला बहर येत आहे. लाल, गुलाबी रंगाची, गोड आंबट चवीची छोट्या कागदाच्या खोक्यामधील स्ट्रॉबेरी पाहिल्यावर प्रत्येकांच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसांत आरोग्यदायी असणारी स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असते.

सध्या थंडीचा हंगाम (winter season) असल्याने या पिकांला चांगला बहर आला असुन आदिवासी भागातील शेतकरी (farmer) बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. काही शेतकरी मोठ्या घाऊक व्यापारी वर्गाला माल देतात. काही मुंबई (mumbai), गुजरात (gujrat), व महाराष्ट्रातील (maharashtra) विविध भागांत हा माल विक्रीसाठी पाठवितात. परंतु काहींना तत्काळ नगदी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी वणी (vani), सापुतारा (saputara), विविध धार्मिक स्थळे या ठिकाणी छोटी दुकाने थाटुन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवतात.

या विक्रीतुन परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी अर्थार्जन होऊ लागले आहे. पेठ, कळवण, सुरगाणा, ननाशी घाडाजवळली काही भाग, तसेच घाटमाथ्यावरील लाल मातीत पिकणारी लालभडक आंबट गोड स्ट्रॉबेरी फळे वणी,सापुतरा,सप्तशृंगी गड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दिसत असल्यामुळे प्रत्येक प्रवासी, भाविक, पर्यटक यांचे मन आकर्षित करून खरेदी करतांनाचे चित्र सध्या दिसत आहे.

स्ट्रॉबेरी हे पिक साधारणपणे कळवण, सुरगाणा, पेठ आदी भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारण या भागातील जमिनीतील माती ही लाल स्वरूपांची असल्याने ती या पिकांच्या पोषकांला महत्त्वाची मानली जाते. पिकही जोमाने येत आहे. त्यामुळे या भागांतील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीचे पिक घेऊ लागला आहे. परिणामी दिंडोरी तालुक्यातील काही भागात स्ट्रॉबेरी पिकांचे क्षेत्र वाढु लागले आहे. या भागातील शेतकरी वर्ग नगदी भांडवल मिळवून देणारे पिक म्हणून स्ट्रॉबेरीकडे आशेने पाहु लागला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या