गुजरातमधील द्वारकेमध्ये भूकंप

गुजरातमधील द्वारकेमध्ये भूकंप

गुजरातमध्ये द्वारकामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारी 3:15 वाजता राज्यातील काही भागात जमीन हादरल्याची जाणीव झाली. याची तीव्रता 5 एवढी मोजण्यात आल्याचे भूकंप केंद्राने म्हटले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू द्वारकेच्या उत्तर-वायव्येस 223 किमी अंतरावर होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाचे कारण काय?

पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर हे भूकंपाचे मुख्य कारण आहे. पृथ्वीच्या आत सात प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एखाद्या ठिकाणी आदळतात तेव्हा तिथं एक फॉल्ट लाइन झोन तयार होतो आणि पृष्ठभागाचे कोपरे वळले जातात. पृष्ठभागाचे कोपरे वळल्यामुळे तिथं दबाव निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्स तुटल्यामुळे आतल्या उर्जेला बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो, त्यामुळे पृथ्वी हादरते आणि आपण त्याला भूकंप समजतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com