Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यारस्त्यांवर धूळ; नागरी आरोग्य धोक्यात

रस्त्यांवर धूळ; नागरी आरोग्य धोक्यात

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

यंदा पाऊस ( Rain ) मोठ्या प्रमाणात पडला आहे. यामुळे शहरातील जवळपास सर्व मुख्य रस्त्यांवर खड्डेच खड्डे ( Pits on Roads )पडलेले होते. महापालिकेने सतत खड्डे बुजवण्याची प्रयत्न केले असले तरी शहरात हजारो खड्डे अद्याप बाकी आहे, मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता या खड्ड्यांमधून उडणारी धूळ ( Dust )यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने आता डांबरीकरण सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात पावसामुळे खड्डे होणे हे काही नवीन प्रकार नाही, मात्र खड्डे बुजवण्यात आल्यानंतर रस्ते सपाट होतात. मात्र यंदा पावसाळा लांबल्यामुळे रस्त्यांवरील खड्डे सतत वाढत आहे. नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे तर दुसरीकडे लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे.

यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहे तर दुसरीकडे शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांमधून निर्माण होणारे धूळ हे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारी ठरत आहे. शहरातील वडाळा मोहम्मद अली रोड, द्वारका, सारडा सर्कल, अशोका मार्ग, शालिमार चौक, दूध बाजार, वडाळा नाका, मोठा राजवाडा, टाकळी रोड अशा मुख्य रस्त्यांवर खड्डे पडले असले आहे. तसेच त्याच्यामुळे धुळ निर्माण होऊन ते वाटचालकांना त्रासदायी ठरत आहे.

धुळ डोळ्यांमध्ये जाते त्यामुळे डोळ्यांचे आजार देखील वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. महापालिकेने आता पावसाने विश्रांती घेतल्याचा फायदा घेत डांबरीकरण सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या