मुंबईसह कोकण वगळता पुढील आठवड्यात पाऊस कमीच

पाऊस
पाऊसRain

नाशिक । प्रतिनिधी

ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाच्या वातावरणानंतर आजपासून पुढील आठवडाभर म्हणजेच रविवार दि.१३ ऑगस्टपर्यंत मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते,असा अंदाज पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.

मुंबईसह कोकणात अति जोरदारपणे कोसळलेल्या पावसाची तीव्रताही या आठवड्यात काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.सह्याद्रीच्या घाटमाथा धरण जलसंचय क्षेत्रात गेले ४० दिवस जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील धरणे १ ऑगस्टला ७० टक्क्यांपर्यंत पोहोचली. परंतु,तेथेही आता पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे धरणे शंभर टक्के भरून ओसंडणे व नदी-नाल्यांना पूरपाण्याच्या अपेक्षेसाठी चांगलाच कस लागणार आहे.

एकंदरीत पावसाच्या पाण्यावर जगवलेल्या खरीपातील पिकांना चांगल्या पावसाअभावी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याची शक्यता जाणवते.तसेच खरीपासारखेच येणाऱ्या रब्बी हंगामाच्या नियोजनासाठीही जपून पावले टाकावी लागतील, असे जाणवते,असेही माणिकराव खुळे, यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com