Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच थांबले ढोल-ताशांचे वादन

नाशकात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच थांबले ढोल-ताशांचे वादन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच दिसून आला. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून आला. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचा निरोप देण्यात येत आहे…

- Advertisement -

ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम कुंड उभारण्यात आली आहेत. गणेश मूर्तींचे विसर्जन नदीत न करता कृत्रिम कुंडात करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तसेच आज विविध सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका निघत आहेत. यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात आणि मिरवणूक मार्गांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील मुख्य विसर्जन मिरवणुकीत २४ गणेश मंडळे सहभागी झाली आहेत. मिरवणूक मार्गावरील मशिदीत अजान सुरु झाल्याने शिवसेवा मित्र मंडळाने मिरवणूकीतील वादन थांबवण्यात आले. शिवसेवा मित्र मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या