नाशकात डंपर-चारचाकीचा अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत

नाशकात डंपर-चारचाकीचा अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत

नाशिक | Nashik

शहरात विविध ठिकाणी दररोज अपघाताच्या घटना घडत असून आज शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या एबीबी सर्कल (ABB Circle) येथे कचने भरलेला डंपर आणि चारचाकीचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, सिटी सेंटर मॉलकडून (City Center Mall) दोन्ही गाड्या त्र्यंबकरोडच्या (Trimbakrod) दिशेने जात होत्या. त्यावेळी ओव्हरटेकच्या नादात हा अपघात घडल्याचे समजते. या अपघातात चारचाकीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते.

दरम्यान, यावेळी एबीबी सर्कल परिसरात अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com