Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली लाखोंची फसवणूक

सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली लाखोंची फसवणूक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मोबाईलवर एका मेसेजवर आलेली लिंक डाऊनलोड करण्याच्या नादात एकाची पाच लाखापेक्षा जास्त रूपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. याबाबत सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई करत पैसे पुन्हा मिळविण्यात यश मिळवले आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

एका ग्राहकाची बँकेत ऑनलाईन 7 लाखांची एफडी केली होती. त्याने लिंक डाऊनलोड केल्यानंतर एफडीवर 5 लाख 25 हजारांचे कर्ज मंजुर करुन ती रक्कम विविध खात्यात वर्ग करत ग्राहकाची फसवणूक करण्यात आली. मात्र सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ग्राहकाला पैसे परत मिळाले आहे. तक्रार दाखल झाल्यावर त्वरित सायबर पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून हॅकरच्या खात्यात जमा झालेली रक्कम ग्राहकाला परत मिळून दिली.

भरत कासार (रा. अशोक नगर) यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मुलीच्या लग्नासाठी फिक्स मध्ये 7 लाखांची ऑनलाईन एफडी केलेली होती. कासार यांना पॅनकार्ड व्हेरीफिकेशन करीता टेक्स मेसेजवर लिंक पाठवली. लिंक ओपन करण्यास भाग पाडून त्यावर बँक खाते व नेट बँकिंग आयडी पासवर्ड ची माहिती भरण्यास लावत ऑनलाईन युनी अॅप मधून 7 लाखांच्या एफडीवर 5 लाख 25 हजारांचे कर्ज मंजुर करुन रक्कम विविध बँकेत ट्रान्सफर केली होती.

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात मोबाईल स्क्रिन अॅक्सेस सायबर हॅकरने घेतल्यामुळे तक्रारदार यांनी ओटीपी दिला नसतांना फसवणूक झाल्याने बँकेने सायबर पोलिसांत तक्रार देण्यास सांगीतले. वरिष्ठ निरिक्षक सुरज बिजली, संतोष काळे, किरण जाधव, यांनी स्टेट बँकेत जाऊन माहिती घेतली असता बँकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ते रक्कम ग्राहकाच्या खात्यात वर्ग करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या