गुजरातच्या 'या' खासदारानी  महाराष्ट्रात उधळली मुक्ताफळे  
USER

गुजरातच्या 'या' खासदारानी महाराष्ट्रात उधळली मुक्ताफळे  

 महाराष्ट्रात जातिवाद वाढल्याने राज्य पिछाडीवर : खा.सी.आर.पाटील 

रावेर raver|प्रतिनिधी

येथे महाराष्ट्रात (maharashtra) भाजपचे सरकार (BJP Govt) बहुमताने का येत नाही,राज्यात जातिवाद (Casteism in the state) वाढला आहे,त्यामुळे हळू हळू मागे पडत आहे,गुजरात राज्य समृद्ध आहे,तिथे विकास होतो,गुजरात मध्ये जातीवाद नाही अशी मुक्ताफळे (Muktaphale) खा.सी.आर.पाटील (MP C.R.Patil ) यांनी सावदा (ता.रावेर) येथे उधळली.      

    सावदा येथील एका खाजगी इस्पितळाच्या  उद्घाटनाला गुजरात नवसारी येथील खा.सी.आर.पाटील आले होते.

यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे गटनेते एकनाथ खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,खा.रक्षा खडसे,माजी आमदार अरुण पाटील व  मान्यवर होते.

यावेळी राज्य मागे पडत असल्याची चिंता खा.पाटील यांनी व्यक्त करत असतांना, राज्यात जातिवाद वाढला असल्याचे सांगितले.महाराष्ट्रात जातीवाद आहे,गुजरातमध्ये नाही,त्यामुळे गुजरातचा विकास होत आहे,महाराष्ट्र मागे पडत चालले आहे.राज्याला पुढे नेण्यासाठी जातीवाद सोडवा असे विचार मांडून ते गेले.     

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com