Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याडॉ.बाबासाहेबांच्या घटनेमुळे संपूर्ण देश एकसंध - मंत्री छगन भुजबळ

डॉ.बाबासाहेबांच्या घटनेमुळे संपूर्ण देश एकसंध – मंत्री छगन भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेली दोन अडीच वर्षे कोरोनामुळे कुठलेही कार्यक्रम साजरे होत नव्हते. मात्र आता करोनाचे ( Corona )निर्बंध हटल्याने आज जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती ( Dr. Babasaheb Aambedkar Jayanti ) उत्साहात आपण साजरी करत आहोत याचा आनंद आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते जगातील अतिशय महत्वाचे अर्थतज्ञ होते. त्यांनी निर्माण केलेल्या घटनेमुळे आपला संपूर्ण देश एकसंध राहिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal )यांनी केले.

- Advertisement -

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार वसंत गीते, शिवसेना उपनेते सुनील बागुल, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर,गजानन शेलार, आनंद सोनवणे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, संजय साबळे, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, शेलार,नाना पवार, जीवन रायते, संजय खैरनार, दिलीप साळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज नाशिक शहरातील मोठा राजवाडा, चौक मंडई, दंडे हनुमान मित्र मंडळ, सातपुर आणि स्वारबाबानगर येथे आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या