महाविकास आघाडीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, संजय राऊतांनी अनंत गीतेंना सुनावले


महाविकास आघाडीमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, संजय राऊतांनी अनंत गीतेंना सुनावले
संजय राऊत

शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीमुळेच (maha vikas aghadi)उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत, अशी भूमिका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मांडली. अनंत गीते यांनी केलेल्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नाही, ते त्यांचे वैयक्तीक मत असल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत
धमाका होणार; तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात, हे आहेत १५ जण

दिल्लीत माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, ‘मला गीतेंच्या वक्तव्याविषयी माहित नाही. उद्धव ठाकरे त्याविषयी निर्णय घेतील. ते पक्षाचे प्रमुख आहेत. या क्षणी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत आणि सरकार चांगल्या प्रकारे चालेललं आहे. राज्यात सध्या शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकला. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही. सरकार उद्धव ठाकरे चालवतात. त्या सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन प्रमुख घटक आहेत. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यामुळे कोणाची काही मतं असतील ती व्यक्तिगत मतं असतील.'

काय म्हणाले होते गीते

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com