Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पावसाची जोरदार बॅटिंग; गंगापूरसह 'या' धरणांमधून विसर्ग सुरु

नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग; गंगापूरसह ‘या’ धरणांमधून विसर्ग सुरु

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पावसाची आतुरतेने वाट बघणार्‍या नाशिककरांवर शुक्रवारी सायंकाळी पावसाने बरसात केली. ढगांच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे…

- Advertisement -

शहरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. सहाच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरवात झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

Video : करंजवण धरण ओव्हरफ्लो, ‘इतक्या’ पाण्याचा विसर्ग

गंगापूर धरणातून सायंकाळी ७ वाजता 1136 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. नऊ वाजता गंगापूर धरणातून २१८२ने विसर्ग वाढवून तो एकूण ३३१८ क्युसेस करण्यात येणार आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून 5 वाजता 4035 क्यूसेसने विसर्ग सुरु होता. सायंकाळी 6 वाजता 3155 क्यूसेसने विसर्ग वाढवून एकूण 7190 क्यूसेस करण्यात येणार आहे.

कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्यामुळे कडवा धरणातून संध्याकाळी 7 वाजता एकूण 212 Cusecs ने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

करंजवण धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज रात्री ९ वाजता धरणातून कादवा नदी मध्ये ३०१ क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच पालखेड धरणातून सध्या २१८ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावले, पिकांना जीवदान

- Advertisment -

ताज्या बातम्या