मद्यधुंद चारचाकी चालकाची दुचाकी स्वारांना धडक; चार जखमी

मद्यधुंद चारचाकी चालकाची दुचाकी स्वारांना धडक; चार जखमी

नाशिक |प्रतिनिधी Nashik

मद्यधुंद चारचाकी चालकाने शहरात दोन ठिकाणी चार दुचाकी स्वारांना उडवल्याने चार जण जखमी झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,साहेबराव दौलत निकम याने मद्यधुंद अवस्थेत त्याची चारचाकी ( एम एच १५ जी एक्स ३०९६) चालवत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांना तर मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जणांना उडवल्याने असे चार जण जखमी झाले आहेत.

या अपघातात निकम हा देखील जखमी झाला असून त्याने नेमके किती जणांना उडवले याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान चारचाकीचे पुढचे चाक तुटल्याने गाडी बंद पडल्याने पुढील अनर्थ देखील टळला.

सदरहू चारचाकी वाहन अंबड पोलीस ठाण्यात जमा केल्याने अंबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत निकम याने आणखी कुणालाउडवले का याचा देखील पोलीस शोध घेत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com