Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याथकबाकीदारांच्या घरासमोर आजपासून ढोल वाजणार

थकबाकीदारांच्या घरासमोर आजपासून ढोल वाजणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणजे घरपट्टी, पाणीपट्टी असते. मात्र, नाशिक महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्यामुळे उद्यापासून महापालिकेच्या वतीने थकबाकीदार यांच्या दारासमोर थेट ढोल वाजून थकबाकी वसूल करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यासाठी 1258 लोकांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून, शहरातील सहाही विभागात एकाच वेळेला वसुलीला सुरुवात होणार आहे. दरम्यान ढोल वाजवण्यापूर्वी पुन्हा एकदा विचारणा होणार असल्याचे समजते. थकबाकीदारांनी चेक किंवा रोख रक्कम दिली तर ढोल वाजणार नाही.

नाशिक शहरातील पूर्व विभाग, पश्चिम विभाग, पंचवटी विभाग, नवीन नाशिक विभाग, सातपूर विभाग तसेच नाशिकरोड या सहा विभागांत एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेले एकूण 1258 थकबाकीदार आहेत. या बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असूनही त्यांच्याकडून थकबाकी भरली जात नसल्यामुळे थकीत करांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरांसमोर सोमवारपासून ढोल वाजविण्यात येणार आहेत. घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा पाचशे कोटींपर्यंत गेला आहे.

करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर महापालिकेने करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविलेल्या करसवलत योजना महापालिकेला चांगली पावली होती. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना, मतदार याद्या तयार करणे, त्यावरील हरकतींची छाननी करणे या कामांसाठी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे करवसुली पुन्हा ठप्प पडली होती. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश करवसुली विभागाला दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या