Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यालाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त

लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त

घोटी | जाकीर शेख Ghoti

घोटी पोलीसांनी ( Ghoti Police ) गुप्त माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर व पोलीस पथकाने मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाक्याजवळील खंडोबा हॉटेल समोर एका वाहनांची झडती घेतली असता ४ लाख ३० रुपये किमतीचे वेगवेगळे गांजा सदृष्य अमली पदार्थ विना परवाना आढळुन आल्याने पोलीसांनी २ संशयित आरोपींना अटक करून १० लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केली आहे.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती अशी की, मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोल नाक्याजवळील ( Ghoti Toll Plaza )हॉटेल खंडोबा समोर एम. एच. 04 के. डब्लु 8949 या वाहनांची झडती घेतली असता विमल पान मसाला नावाच्या पिशवीत खाकी प्लास्टीक चिकटटेप पॅकिंग केलेले उग्र वासाचे गांजा सदृष्य पदार्थाचे दोन पुडे व मिलाप नावाच्या काळ्या व खाकी रंगाच्या पिशवीत खाकी प्लास्टीक चिकटटेप पॅकिंग केलेले उग्र वासाचा गांजा सदृष्य पदार्थाचा एक पुडा असे एकुण वजन १९ किलो ४७४ ग्रॅम मादक पदार्थ गांजा असा ३ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करीत असताना आढळुन आला.

या प्रकरणी संदेश दोन जणांना अटक केली. पोलीस नाईक प्रसाद दराडे यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 (ब) प्रमाणे घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपींकडुन ३ लाख ८० हजार रुपये किमतीचे गांजा सदृश अमली पदार्थ व ५० हजार रुपये किमतीचे सॅमसंग व ओपो कंपनीचे दोन मोबाईल असा ४ लाख ३० हजार रुपये व १० लाख रुपये किमतीचे वाहन अशी एकुण १४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर सहायक पोलीस निरीक्षक श्रध्दा गंधास, उप निरीक्षक संजय कवडे, पोलीस हवा. प्रसाद दराडे, शितल गायकवाड, विक्रम झाल्टे, योगेश यंदे आदी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या