Lalit Patil Arrested : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई | Mumbai
ड्रग्ज माफिया (Drug Mafia) आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेल्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई साकीनाका पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) तामिळनाडू येथून अटक (Arrested) केली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) फरार झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलीसांची दहा पथके तैनात करण्यात आली होती. त्यानंतर अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. यानंतर आज ललित पाटीलला पुण्यात (Pune) आणल्यानंतर न्यायलयात (Court) हजर केले जाणार आहे....
पुण्यातील ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेला ललित पाटील २ ऑक्टोबर रोजी पळून गेला होता. त्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. या सर्व घडामोडी दरम्यान पुणे पोलिसांनी (Pune Police) ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना उत्तरप्रदेशमधून (Uttar Pradesh) अटक केली होती. यानंतर त्या दोघांना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. त्याच दरम्यान आता या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी तामिळनाडू (Tamil Nadu) येथून अटक केली.
दरम्यान, ललित पाटीलला पळून जाण्यासाठी एका बडा नेत्याचा हात असल्याचे आरोप करण्यात येत होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू होते. या दरम्यान ललित पाटील मात्र एका ट्रॅव्हल कंपनीच्या कारने त्याच्या दोन सहकाऱ्यांसह आधी गुजरात, धुळे मग कर्नाटक आणि नंतर बंगळूरूला पोहचला होता. या सर्व प्रवासादरम्यान ललित हा अटकेत असलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. अखेर एका हॉटेलमध्ये तो थांबलेला असताना साकीनाका पोलिसांनी सापळा रचून त्याच्यासह आणखी दोघांना अटक केली आहे.