Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

ड्रग्ज प्रकरणातील धुळ्याचा सुनील पाटील अन् मोहीत कंबोज

आर्यन खान (Aryan Khan)ड्रग्ज केस (Drugs Party)प्रकरणात शनिवारी पुन्हा टि्वस्ट आले. भाजप नेते मोहित कंबोज-भारतीय यांनी पत्रकार परिषद घेऊन मुळ धुळ्यातील (Dhule)असलेला सुनील पाटील (Sunil paitl)हाच या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला. कोण आहेत सुनील पाटील, कोण आहेत मोहित कंबोज-भारतीय अन् काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ या…

सलमानने सांगितले, त्याची कोट्यावधीची मालमत्ता कोणाला देणार?

- Advertisement -

काय आरोप आहेत मोहित कंबोज-भारतीयचे

मोहित कंबोज-भारतीय यांनी शनिवारी ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, “सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे. अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत. आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या २० वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत. अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे.”

भाजप नेते आशिष शेलार म्हणाले,“राज्यात राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांचे त्यांच्याशी घरगुती संबंध आहेत. अनिल देशमुखांवर इडीची सुरू असलेल्या कारवाईत सुनील पाटील यांची भूमिका आहे. राज्याच्या गृहविभागात अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी सुनील पाटील पैसे घेत होते. सुनील पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत होते. १९९९ ते २०१४पर्यंत सुनील पाटील यांचं रॅकेट अॅक्टिव्ह होतं. २०१४मध्ये सरकार बदलल्यानंतर ते अंडरग्राउंड झाले. २०१९नंतर सुनील पाटील पुन्हा महाराष्ट्रात, मुंबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये बदल्यांचं रॅकेट चालवत आहेत. यात महाविकासआघाडीच्या अनेक मंत्र्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत.” परराज्यातून तो व्यवहार हाताळीत असल्याने आंतरराज्य प्रकरणाचा तपास सीबीआयला द्यावा, असे शेलार यांनी सांगितले.

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

कोण आहेत सुनील पाटील अन् काय संबंध धुळ्याचे

धुळ्यातील सुनील पाटील (Sunil Patil) याचा राष्ट्रवादीशी (NCP) संबध काय आहे, जाणून घेऊ या…

सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. सुनील चौधरी पाटील हे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अत्यंत जवळचा मानला जातो. बबनराव पाचपुते जेव्हा 2009 ते 2014 मध्ये NCP मधून आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यावेळी तो त्यांच्या बंगल्यावर नेहमी दिसत होता.

सुनील पाटील हे धुळ्याचे असले तरी गेली अनेक वर्ष त्यांचा रहिवास मुंबईत आहे. कधी दिल्ली ते कधी गुजरात असेही त्यांचे वास्तव्य असते. अगदी डांन्स बार ते मंत्रालय असा त्यांचा सहज वावर असतो. मध्यस्थाची भूमिका निभावणे, न घडून येणाऱ्या गोष्टी घडवून आणणे किंवा एखाद्या विषयाचे अथवा व्यक्तीचे पाळेमुळे शोधून आणणे, यात त्याचा हातखंड आहे.

धुळ्याशी संबंध काय?

  • धुळे शहरापासून अवघे दहा कि.मी. अंतरावर असलेल्या गावचे रहिवाशी सुनील पाटील हा मुळात त्यांच्या पुर्वजांना मिळालेल्या ‘पाटीलकी’मुळे पाटील आडनाव लावतो. आजही धुळ्यातील टेकडी परिसिरात त्याचे आई-वडिल व अन्य सदस्य राहतात. याठिकाणी त्यांचा बंगलाही आहे.

  • सुनिल पाटील यांनी काही वर्षांपुर्वी शहरातील मध्यवर्ती भागातील गणेश मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारुन त्यावेळी लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. अधुन मधून धुळ्यात येणे-जाणे होत असले तरी त्यांचा नेमका ठावठिकाणा सांगता येणारा नाही.

  • सतत फिरस्तीवर असणारा हा गृहस्थ आर्यन प्रकरणात चर्चेत आला असला तरी त्याच्यामुळे पुन्हा एकदा धुळे चर्चेत आले आहे. काही महिन्यांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणातही धुळ्याचे नाव घेतले गेले. यापुर्वी अशाच काही प्रकरणात धुळे चर्चेत आले. यात पुन्हा एकदा या सुनिल पाटीलमुळे भर पडली आहे.

आता कोण आहेत मोहित कंबोज

ड्रग्ज प्रकरणाला वेगळे वळण देणारे मोहित कंबोज-भारतीय हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहे. मुंबई भाजपचे ते सरचिटणीस होते. २०१३-१४ मध्ये मुंबई भाजपचे उपाध्यक्ष होते. तसेच २०१४मध्ये मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदार संघातून भाजपचे उमेदवारही होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या