Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ड्रोन दिसल्याने खळबळ

नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ड्रोन दिसल्याने खळबळ

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

नाशिक- पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) असलेल्या गांधीनगर (Gandhi Nagar) येथील लष्करी हद्दीतील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (Combat Army Aviation Training School) या परिसरात ड्रोन उडविण्यास बंदी असताना सुद्धा सदर परिसरात ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत ड्युटी ऑपरेटर नायक जर्नल सिंग (Duty Operator Nayak Journal Singh) यांनी सांगितले की, कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल परिसरात गुरुवारी (दि.२५) रात्री दहा वाजेच्या सुमारास ड्रोन उडत असल्याचे दिसले. यानंतर तात्काळ याबाबत मंदिर सिंग (Mandir Singh) यांना माहिती दिली. त्यानंतर मेजर आशिष (Major Ashish) यांचा फोन आला, की आपल्या कॅट्सच्या हद्दीत ड्रोन उडत आहे.

यानंतर मनदीप सिंग यांनी खात्री केली असता सदरचा ड्रोन ८०० फूट उंचावर फिरत असल्याचे दिसले. त्यानंतर मनदीप यांनी त्वरित बेस सिक्युरिटी ऑफिसर लेफ्ट कर्नल व्ही रावत (V Rawat) यांना ड्रोन बाबत माहिती देत ते फायरिंग करून पाडण्याची परवानगी मागितली. यानंतर रावत यांनी पुन्हा सदरचा ड्रोन दिसल्यास उडवून टाका असे सांगितले. मात्र याचवेळी सदरचा ड्रोन हद्दीतून निघून गेला.

दरम्यान यासंदर्भात मनदीप सिंग यांनी त्वरित उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर (Senior PI Nilesh Mainkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश भामरे (Assistant PI Rakesh Bhamre) करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या