राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट; अँटी ड्रोन यंत्रणाच नसल्याने चिंता

राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट; अँटी ड्रोन यंत्रणाच नसल्याने चिंता

प्रजासत्ताक दिन (Republic Day ) जेमतेम दोन आठवड्यांवर येऊन ठेपला असताना महाराष्ट्रावर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. विशेष म्हणजे यावेळी राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका (Drone Attack Alert) व्यक्त केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट; अँटी ड्रोन यंत्रणाच नसल्याने चिंता
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

दहशतवादी ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करू शकतील अशी शक्यता काही रीपोर्टमधून समोर आलेल्या माहितीमधून निर्माण झाली आहे. मात्र याबद्दलची धक्कादायक माहिती अशी की, राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर आलं आहे. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत.

डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण

ड्रोन जितके उपयोगी आहेत, तितकेच ते धोकादायकही आहेत. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये संभाव्य ड्रोन हल्ल्यांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा सतत सतर्कतेची सूचना देत असतात. तपास यंत्रणांना नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की, डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत.

राज्यात अँटी ड्रोन यंत्रणाचे नाही

राज्यात ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर कोणतीच सुरक्षा व्यवस्था नसल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवावी लागणार आहे. या नव्या धोक्यामुळे तपास यंत्रणा हादरल्या आहेत. त्यामुळे राज्याचा गृहविभाग याबद्दल काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com