कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?

कोण होणार देशाचे नवे राष्ट्रपती? द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?

नवी दिल्ली । New Delhi

भारताच्या राष्ट्रपती पदासाठी सोमवारी (दि.१८) झालेल्या मतदानानंतर (Voting) आज त्याची मतमोजणी होणार आहे. सकाळी ११ वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतमोजणीस सुरूवात होईल. द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यापैकी कोणीही उमेदवार ५ लाख ४९ हजार ४४२ मते मिळवतील तो ही निवडणूक जिंकेल. तर २५ जुलै रोजी नवीन अध्यक्षांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाईल...

राष्ट्रपतीपदासाठी (President Election) भाजपकडून (BJP) द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधी पक्षांकडून (Opposition Parties) यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच या निवडणुकीत बहुमताच्या जोरावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तसेच सोमवारी (दि.१८) झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात (Union Territories) १०० टक्के मतदान पार पडले. तर राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार (MP) आणि ४०२५ आमदारांसह (MLA) ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान,राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू जिंकल्या तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला (Tribal women) राष्ट्रपती बनतील. यापूर्वी आजपासून १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी २१ जुलै रोजी देशाला प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या.त्यामुळे आता नेमकी मतमोजणी झाल्यानंतर काय निकाल लागणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com