द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi

राष्ट्रपतीपदासाठी (President Election) १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपासून संसद भवनात (Parliament House) मतमोजणीला (Voting) सुरुवात झाली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. यूपीएचे ( UPA)उमेदवार यशवंत सिन्हा ( Yashvant Sinha )यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.

द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की, द्रौपदी मुर्मू या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती असणार आहेत. द्रौपदी मुर्मू विजयानंतर आता 25 जुलैला राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. त्याआधी म्हणजेच 24 जुलै सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.

मतमोजणी आधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. कारण भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना विजय मिळावा यासाठी प्रचंड मोर्चोबाधणी केलेली होती. दरम्यान निवडणुकीत काही खासदार आणि आमदारांनी या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं आहे.

द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची मतं मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मतं मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य 3 लाख 78 हजार तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य 1 लाख 45 हजार इतकं होतं. या दरम्यान पहिल्या फेरीत 15 मतं रद्द झाली.

.द्रौपदी मुर्मू यांना दुसऱ्या फेरीतील मतमोजणीतही घवघवीश मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या दहा राज्यांची मतमोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण 1886 मतं वैध ठरली. त्यापैकी द्रोपदी मुर्मू यांना 1349 मतदान झालं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com