निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ.सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ.सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई | Mumbai

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Graduate Constituency Election) काँग्रेसकडून (Congress) डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पंरतु,अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. तांबेंनी माघार घेत त्यांच्याऐवजी पुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर कॉंग्रेस हायकमांडने याप्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. सुधीर तांबेंवर निलंबनाची कारवाई केली आहे.

पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच काँग्रेसने डॉ. सुधीर तांबेंवरील निलंबनाच्या कारवाईचे पत्रक जारी करत ही माहिती दिली. त्यानंतर आता डॉ. तांबे यांनी त्यांच्यावरील कारवाईवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी डॉ. तांबे म्हणाले की, 'मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजले आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com