आज खऱ्या अर्थानं...; सत्यजीत यांच्या 'त्या' ट्विटवर डॉ. सुधीर तांबेंची प्रतिक्रिया

आज खऱ्या अर्थानं...; सत्यजीत यांच्या 'त्या' ट्विटवर डॉ. सुधीर तांबेंची प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आजपासून सुरु झाले असून तब्बल ४ आठवडे म्हणजेच २५ मार्चपर्यंत हे अधिवेशन सुरु राहणार आहे. यावेळी विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) निवडून आल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबेंनी (Satyajeet Tambe) त्यांच्या पहिल्या अधिवेशनासाठी हजेरी लावली.

आज खऱ्या अर्थानं...; सत्यजीत यांच्या 'त्या' ट्विटवर डॉ. सुधीर तांबेंची प्रतिक्रिया
लासलगावला शेतकऱ्यांचे आंदोलन; कांदा लिलाव पाडले बंद

यावेळी विधानभवनात प्रवेश करतांना आमदार सत्यजीत तांबेंनी ट्विट करत भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, "जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. माझे आई-वडील-मामा,माझे सर्व मित्र, माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशिर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे", असे तांबे म्हणाले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

आज खऱ्या अर्थानं...; सत्यजीत यांच्या 'त्या' ट्विटवर डॉ. सुधीर तांबेंची प्रतिक्रिया
नाशिक : भूमी अभिलेखच्या लिपिकाला ४० हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

त्यानंतर आता सत्यजीत तांबेंचे वडील माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr.Sudhir Tambe) यांनी सत्यजीत यांचे ट्विट रिट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. "सत्यजीत, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय. मला खात्री आहे विधानभवनात देखील तू पदवीधरांचे, तरुणांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्याच ताकदीने मांडशील आणि यशस्वीपणे सोडवशील! माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या पाठीशी आहेत", असे डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com