Friday, April 26, 2024
Homeजळगावपारोळा बाजार समिती सभापती पदी डॉ. सतीश पाटील बिनविरोध

पारोळा बाजार समिती सभापती पदी डॉ. सतीश पाटील बिनविरोध

 पारोळा Parola श. प्र..

येथील बाजार समिती (Parola Bazar Committee) सभापती (Chairman) निवड एक मताने होऊन त्यात माजी राज्य मंत्री डॉ सतीश पाटील (Dr. Satish Patil) यांच्या नावावर सभापती पदी एक मताने सर्व म.वी.आघाडी सदस्यांनी शिक्का मोर्तब केले तर उपसभापती पदी सुधाकर पाटील हे देखील बिन विरोध (unopposed) म्हणून घोषित केले गेले.

- Advertisement -

यावेळी डॉ सतीश पाटील,ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष पीरण अनुष्ठान यांच्या सह सर्व नूतन सदस्य यावेळी उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत म.वी आघाडीने एकजुटीने लढत देत सेनेच्या ११ वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावत १८ पैकी १५ जागा विजयी करत एक तर्फी विजय मिळवला होता. विशेष म्हणजे सदर निवडणुकीत माजी सभापती अमोल पाटील यांनी डॉ सतीश पाटील यांना थेट आव्हान दिले होते तर पराभूत झालो तर राजकीय संन्यास घेईल अशी मोठी भूमिका डॉ सतीश पाटील यांनी घेतली होती. दोन्ही गटाकडून मेळावे घेत मोठे शक्ती प्रदर्शन झाल्याने तसेच येणाऱ्या पुढील निवडणुकी पाहता जिल्ह्याचे लक्ष पारोळा निकालाकडे लागून होते .

परंतु प्रभावी प्रबोधन करत आघाडी ने शेतकऱ्यांचे मत आपल्या कडे वळवून घेतल्याने तालुक्यात मोठी चर्चा झाली. एकी कडे आमदार चिमणराव पाटील यांनी मागील वर्ष भरात शेकडो कोटी चां निधी आणून अनेक विकास कामना प्रत्यक्ष सुरू केलेले असताना मात्र बाजार समितीत मागील काळात टोकन प्रकरण चांगलेच गाजल्याने तसेच भरड धान्य खरेदी प्रकरण शेतकऱ्यांना जिव्हारी लागल्याने मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान करत आघाडी ला एकतर्फी विजय मिळवून दिला होता.

सभापती निवडी वेळी डॉ सतीश पाटील यांनी बोलताना सांगितले की बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे मागील काळात पदाचा दुरूपयोग करून काही गैर कामे झाली असतील तर आम्ही सर्व विषयांचा मागोवा घेऊन चौकशी लावू  तसेच शेतकरी हित जोपसणारे जे मागतील त्यांना लायसन देऊ ,ओपन लिलाव पद्धत सुरू करून इतर तालुक्यांचे भाव घेऊनच पारोळा येथे शेती मालास भाव दिला जाईल ,कोल्ड स्टरेज साठी अभ्यास करून निर्णय घेऊ ,शेतकऱ्यासाठी निवास व भोजन व्यवस्थेकडे लक्ष दिले जाईल,कापूस असो की कोणताही शेती माल खरेदी मध्ये टोकन पद्धत बंद केली जाईल  असे आपल्या मनोगतात सांगितले.

VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

आठवड्यात तीन दिवस मी स्वतः बाजार समितीस वेळ देऊन लिलाव प्रकियेत भाग घेणार असल्याचे सांगून कट्टी पद्धत या पुढे बंद केली जाईल,बाजार समितीच्या मंगल कार्यालय बाबत नव्याने विचार करू ,वाढीव बोगस मतदान रद्द करून गुरांचा बाजार भरते वेळी योग्य ती फी गोळा करून उत्पन्न वाढ केले जाईल.

मागील निवडणुकीत बिन विरोध करणे ही चूक असल्याचे त्यांनी मान्य करत ,सदर निवडणुकीत सत्ताधारीनी अनेक षडयंत्र रचून ही मतदारांनी आम्हाला कौल दिला आम्ही अहंकाराचा पराभव केला असे डॉ सतीश पाटील यांनी सांगितले.

मेहरगाव फाट्यावर अपघात : 21 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

तर डॉ हर्षल माने यांनी अमोल पाटलांचे गर्व हरण करण्यासाठी आपण ओबीसी मतदार संघातून निवडणूक लढ्वली ज्यांनी स्व बाळासाहेब यांच्या नावावर राजकारण केले त्यांना इतक्या वर्षात सभागृहात साधी प्रतिमा लावता न आल्याची खंत व्यक्त करत आपण पहिल्याच दिवशी प्रतिमा लावणार असल्याचे सांगितले.  तसेच पुढील सर्व निवडणुकीत विरोधकांना धडा शिकवू असे सांगितले.यावेळी महविकास आघाडी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश कासार तर सहायक म्हणून शिल्पा सिंहले यांनी काम पाहिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या