संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांची संमेलनाला ऑनलाईन उपस्थिती

संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांची संमेलनाला ऑनलाईन उपस्थिती

नाशिक । प्रतिनिधी । Nashik

शहराच्या वेशीवर कुसुमाग्रज नगरीत (kusumagraj nagari) आजपासून सुरू होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (marathi sahitya sammelan) संमेलनाध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर (Dr. Jayant Narlikar) ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे...

भारतीय मौसम विभागाने उद्यापर्यंत पावसाचे आणि ढगाळ वातावरणाचे संकेत दिले आहे. डॉ. नारळीकर यांची प्रकृतीचा विचार करता त्यांना हेलिकॉप्टर किंवा विमानाने उपस्थित रहावे लागणार होते. मात्र ऐनवेळी असे वातावरण झाल्याने विमानाबाबतदेखील साशंकता व्यक्त केली जात आहे.

करोना विषाणूचा नवा व्हेरिएंट, ढगाळ वातावरणामुळे आरोग्याचा तक्रारी त्यातच डॉ. नारळीकर यांचे वाढते वय बघता ते ऑनलाइन उपस्थित राहतील अशी चर्चा संमेलननगरीत होत आहे.

जरी डॉ. नारळीकर उपस्थित राहत नसले तरी त्यांनी लिहिलेले शुभेच्छा पत्र त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मंगला नारळीकर वाचून दाखवणार आहेत; यावेळी स्वतः डॉ. नारळीकर ऑनलाईन उपस्थित राहणार आहे, असे देखील समजते आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com