Monday, April 29, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर, 'हे' बलाढ्य संघ आमनेसामने

IPL 2023 : आयपीएलमध्ये आज डबल हेडर, ‘हे’ बलाढ्य संघ आमनेसामने

हैदराबाद | Hyderabad

आयपीएलमध्ये (IPL) आज शनिवारी १३ मे २०२३ रोजी डबल हेडर सामने खेळवण्यात येणार आहेत. आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघांमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट मैदानावर दुपारी ३:३० वाजता होणार आहे…

- Advertisement -

आयपीएल १६ मध्ये बाद फेरीच्या शर्यतीत आव्हान कायम ठेवण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे. हैदराबाद संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात जयपूर येथे झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात राजस्थान रॉयल्स संघावर विजय संपादन केला होता. आता आपला विजयाचा पंच मारण्यासाठी उत्सुक हैदराबाद आहे. हैदराबाद संघाच्या खात्यात ८ गुण असून, हैदराबाद संघ गुणतालिकेत तळाला आहे.

आता लखनऊला पराभूत करण्यासाठी आपल्या हैदराबाद घरच्या मैदानावर लखनऊ येथील सलामी साखळी सामन्यातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज हैदराबाद असणार आहे. लखनऊ संघाचा अखेरचा सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झाला होता.

या सामन्यात लखनऊला पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनऊ संघाच्या खात्यात ११ गुण असून आयपीएल गुणतालिकेत लखनऊ पाचव्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. लखनऊ आणि हैदराबादसंघांमध्ये२ साखळी सामने झाले असून दोन्ही सामन्यात लखनौने हैद्राबाद संघाचा पराभव केला आहे.

दिल्ली कॅपिटल्स विजयी शेवट करण्यासाठी सज्ज

आयपीएलमध्ये आज शनिवारी दुसरा सामना पंजाबकिंग्ज (Punjab Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघांमध्ये नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर होणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता होणार आहे.

आयपीएल १६ मध्ये बाद फेरीच्या शर्यतीतून अधिकृतरीत्या बाहेर पडलेला दिल्ली कपिटल्स संघाला विजयी शेवट करण्यासाठी उत्सुक आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून स्पर्धेतील आपला पाचवा सामना जिंकण्यासाठी दिल्ली सज्ज असणार आहे. आयपीएल बाद फेरीच्या शर्यतीत पंजाबकिंग्ज संघाला आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे.

पंजाबकिंग्ज संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे दिल्लीला चेन्नई सुपरकिंग्ज संघाने पराभूत केले आहे. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात पराभव स्वीकारला आहे. विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी दोन्ही संघांचा इरादा असणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी षटकार मारण्यासाठी पंजाबकिंग्ज सज्ज असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या