ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीच

विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या संगनमताने ठराव मंजूर
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीच

मुंबई | Mumbai

ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) निवडणुका (Elections) घेऊ नयेत, निवडणूक आयोगाला त्याबाबत माहिती दिली जावी, असा ठराव विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या संगनमताने सभागृहात मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली...

ओबीसींच्या संदर्भात केंद्र सरकारने (Central Government) फेरविचार याचिका दाखल केली आहे. यात महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) दिलेल्या निर्णयाबाबत आम्ही वकिलाचा सल्ला घेत आहोत.

केंद्र सरकारच्या या याचिकेला साथ देण्यासाठी आम्हीदेखील सामील होणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. याबाबत सर्वपक्षीय ठराव आज सभागृहात घेण्यात येणार असल्याचेदेखील भुजबळ यांनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com