Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याकुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका; अजित पवारांचा सल्ला

कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका; अजित पवारांचा सल्ला

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कायद्याचे (Law) पालन करताना आपण आपल्या कामगिरीने पदाचा गौरव कसा वाढवता येईल, याकडे प्रामुख्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले…..

- Advertisement -

महाराष्ट्र पोलीस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा ११९ व्या सत्राचा दीक्षांत संचलन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधीकारी गंगाथरन डी., विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, महाराष्ट्र पोलीस अकादमी संचालक राजेश कुमार,पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस अकादमीसाठी (MPA) प्रशिक्षणाच्या इमारतीसाठी लागणारा १०० टक्के निधी (Fund) सरकारकडून दिला जाईल असे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी नवनिर्वाचित उपनिरीक्षकांना सांगितले की, सामान्य माणसाचे प्रश्न आपल्याला जरी लहान वाटले तरी ते त्यांच्यासाठी मोठे असल्याने पिडीताला योग्य न्याय मिळवून द्या.

आपण सरकारचा एक भाग असल्याने सर्वसामान्यांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळे सर्वांशी सौजन्याने वागा. आपण सरकारमध्ये असल्याने आपल्यामध्ये बंधुत्वाचे नाते असल्याने वरिष्ठांनीदेखील कनिष्ठांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. आपल्या कामगिरीने आपल्या पदाचा गौरव कसा वाढवता येईल याकडे लक्ष द्यावे. तुम्ही कर्तव्यावर असतांना कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडू नका.

यावेळी बोलतांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी सांगितले की, नागरिकांशी वागताना आपली वर्तणूक सौजन्यशील असली पाहिजे त्यांना यथायोग्य सन्मान द्या त्यांच्या तक्रारीची दखल घ्या.

जनतेचे रक्षक म्हणून समाजात वावरताना पीडितांना आणि वंचितांना न्याय देण्याचे कार्य करावे. तुमच्या सकारात्मक वर्तणुकीने खाकी वर्दी बद्दल जनसामान्यांचा आदर भाव वाढलेला दिसेल.

आपल्या नोकरीच्या कालावधीमध्ये अनेक मोहाचे क्षण येतील त्याला बळी पडू नका भ्रष्टाचाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देऊ नका. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाची दार आपल्याला खुली झाली आहेत हे ज्ञान आत्मसात करा.

यावेळी स्व.यशवंतराव चव्हाण वर्ड कप बेस्ट ऑल राऊंड कॅडेट ऑफ द बॅच आणि बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅच सोर्ड ऑफ रिव्हॉलवर देऊन गणेश वसंत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला तर अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑल राऊंड वुमन कॅडेट ऑफ द बॅच तेजश्री गौतम म्हैसाळे यांना सन्मानित करण्यात आले.

द्वितीय बेस्ट ट्रेनि ऑफ द बॅच म्हणून विशाल एकनाथ मिंढे व बेस्ट कॅडेट इन स्टडीज सिल्वर बॅटेन पुरस्कार प्रतापसिंग नारायण डोंगरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील विविध भागांतून खातेअंतर्गत ३१० पुरुष व १२ महिला असे ३२२ उपनिरीक्षकांनी दीक्षांत समारंभात संचलन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या