डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यरात्री 'ट्विट', म्हणाले बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा दावा करू नये

डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यरात्री 'ट्विट', म्हणाले बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा दावा करू नये

वॉशिंग्टन | washington dc

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. अमेरिकेतील एक-एक घडामोडीकडे लक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री एक ट्विट करून या निवडणुकीतील आव्हान अजून संपले नसल्याचे सांगितले आहे.

काल डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले होते. बायडेन विजयासमीप दिसत असताना ट्रम्प यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

बायडन यांनी जबरदस्तीने राष्ट्राध्यक्षपदावर आपला दावा करू नये. हा दावा मला देखील करता येऊ शकतो. आता कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय येईल असे ट्विट त्यांनी केले आहे.

हा वाद न्यायालयात गेल्यानंतर आता मोठा बदल झाला आहे. याचा फटका बायडेन यांना बसणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जॉर्जियातून बायडेन यांना अधिक मते मिळाली असताना याच राज्यात पुन्हा मतमोजणी केली जाणार असल्याचे राज्याच्या सचिवांनी सांगितले आहे.

जॉर्जियामध्ये 16 इलेक्ट्रोरल वोट आहेत. व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी 538 ‘इलेक्ट्रोरल कॉलेज वोट’ पैकी 270 वोट मिळणं आवश्यक आहे. आतापर्यंत बायडन यांना 264 आणि ट्रम्प यांना 213 इलेक्ट्रोरल मतं मिळाली आहेत. जर बायडन यांना जॉर्जियामध्ये विजय मिळाला तर नेवाडा वा एरिज़ोना (दोन्ही राज्यात बायडन लीडवर ) वा पेन्सिल्वेनिया येथील विजय मिळाल्यानंतर बाइडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com