कोविड योद्धांचे प्राण धोक्यात; करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात 'इतक्या' डॉक्टरांचा मृत्यू

IMA ने जारी केली आकडेवारी
कोविड योद्धांचे प्राण धोक्यात; करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात 'इतक्या' डॉक्टरांचा मृत्यू

दिल्ली | Delhi

करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात कहर केला असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनेही उच्चांक गाठले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच करोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत आतापर्यंत २६९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. रोज सरासरी २०-२५ डॉक्टरांचा मृत्यू होत असल्याची माहिती IMA कडून देण्यात आली आहे. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत.

दुसर्‍या लाटेत डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची संख्या पहिल्या लाटेपेक्षा कमी आहे. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान, ७४८ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान डॉक्टरांच्या मृत्यूंची संख्या अजून जास्त असण्याची शक्यता आहे. IMA फक्त त्यांच्या साडे तीन लाख सदस्यांचा रेकॉर्ड ठेवतं. पण भारतात १२ लाखांहून अधिक डॉक्टर आहेत.

IMA चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे सोमवारी रात्री ११.२० च्या सुमारास करोनामुळे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी डॉ. केके अग्रवाल यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com