VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू

धनबाद | Dhanbad

झारखंडच्या (Jharkhand) धनबादमधील (Dhanbad) एका खासगी रुग्णालयामध्ये भीषण आग (Clinic Fire) लागली. या दुर्घटनेत रुग्णालयामध्ये तैनात असलेल्या डॉक्टर (Doctor) दाम्पत्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू
MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

शुक्रवारी रात्री एक वाजता ही आग लागली. आग लागली त्यावेळी सर्वजण झोपलेले होते. एका डॉक्टराचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी ते पाण्याच्या टबमध्ये बसले, असे सांगितले जात आहे.

आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासानंतर ही आग स्टोअर रूममधून लागली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला पण आग इतकी भीषण होती आणि खोलीत खूप धूर होता की जीव वाचवणे कठीण झाले.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू
सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

या रुग्णालयाचे नाव हाजरा क्लिनिक आणि हॉस्पिटल आहे. हे धनबादच्या बँक मोड पोलिस स्टेशन परिसरात टेलिफोन एक्सचेंज रोडवर आहे. डॉक्टर त्यांच्या कुटुंबासह क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर राहत होते. अपघातात डॉक्टर दाम्पत्य, त्यांची मोलकरीण, डॉ. हाजरा यांच्या पुतण्यासह ६ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. सर्व मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमधून बाहेर काढण्यात आले आहेत.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू
राजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

अग्निशमन विभागाला आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयातील दोन्ही बाजूंच्या एकूण ९ जणांना बाहेर काढलं.

VIDEO : रुग्णालयात अग्नितांडव! किंचाळ्या, लोक सैरावैरा धावले; डॉक्टर दाम्पत्यासह ६ जणांचा होरपळून मृत्यू
वैजापूरमध्ये भरदिवसा जबरी चोरी, ४ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com