Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यालक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी एकाच दिवशी

लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी एकाच दिवशी

नाशिक | प्रतिनिधी

दिवाळीचा सण Diwali Festival-2022 सर्वत्र साजरा होत आहे. दिवाळातील सर्वात महत्वाचा दिवस लक्ष्मीपूजन आज आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी ( Narak Chaturdashi) साजरी केली जाते. यावेळी हा उत्सव 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी हा सण साजरा केला जाणार आहे. तसेच यंदा लक्ष्मीपूजन ( Lakshmipujan) आणि नरक चतुर्दशी दोन्हीही एकाच दिवशी आले आहेत.

- Advertisement -

लक्ष्मीचे वर्णन धर्मशास्त्रात धनाची देवता म्हणून केले जातेे. ज्योतिष शास्त्र लक्ष्मीला धनाची देवी मानते. लक्ष्मीच्या कृपेने माणसाच्या जीवनात सुख-समृद्धी येते. कलियुगात लक्ष्मीजींचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा मानला जातो. अशी अनेकांची भावना आजही कायमआहे. लक्ष्मीला धन, संपत्ती, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.व्यापीक उद्योजकांचे नवीन आर्थिक वर्ष लक्ष्मी पूजनानंतरच सुरु होते. त्यामुळे हिशोबाच्या वह्या, चोपड्यांचे पूजन भक्तीभावाने केले जाणार आहे.दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे विशेष महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन शुभमुहूर्तावरच केले जाते.

लक्ष्मी पूजनाचे मुहुर्त

अमावस्या तिथी २४ ऑक्टोबरला सायं ५:२७ पासून सुरु होईल. अमावस्या २५ ऑक्टोबर सायं ४:१८ पर्यंत असेल.

लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६: ८ ते ८:३८ असे आहे.लक्ष्मीपूजनाचा कालावधी २ तास ३० मिनिटे आहे. त्यामुळे सायंकाळी याच काळात घरोघरी लक्ष्मीपूजन होऊन दिवाळीचा जल्लोष साजरा होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या