Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहसूल आयुक्त कार्यालयावर आदिवासींचा विराट मोर्चा

महसूल आयुक्त कार्यालयावर आदिवासींचा विराट मोर्चा

नाशिकरोड | प्रतिनिधी

येथील महसूल आयुक्त कार्यालयावर (Divisional Commissioner office) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नाशिक जिल्हा किसान सभेच्या (District kisan sabha) वतीने आदिवासींचा विराट मोर्चा व धरणे आंदोलन (Agitation) करण्यात आले…

- Advertisement -

वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी वनजमिनीचे चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरविले दावे तात्काळ पात्र करावे या व इतर अनेक मागण्यांसाठी सदर चा मोर्चा व धरणे आंदोलन येथील महसूल आयुक्त कार्यालयावर करण्यात आले.

माजी आमदार जे पी गावित (former mla j p gavit) त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींचा प्रचंड मोर्चा (Adivasi Morcha) काढण्यात आला. या मोर्चासाठी जिल्ह्यातून आदिवासी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. आदिवासींच्या मोर्चाच्या निमित्ताने नाशिक रोड परिसर व महसूल आयुक्त कार्यालय परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

पोलीस उपायुक्त विजय खरात (DCP Vijay Kharat), सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ (ACP Siddheshwar dhumal) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) पोलीस निरीक्षक गणेश नायदे राजू पाचोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शो बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या