Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक मीना लांंडगे

जिल्ह्यातील पहिल्या महिला बसचालक मीना लांंडगे

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

मामांची साथ, सासूबाईंचे पाठबळ यामुळे आशेवाडीच्या लेकीचे व चिंचोलीच्या सूनबाईचे नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम महिला बसचालक होण्याचे स्वप्न अखेर साकार झाले.नाशिक जिल्ह्यात पहिल्या एसटी बसचालक होण्याचा मान मीना भगवान लांंडगे (रा. चिंचोली) (First female ST bus driver in Nashik district ) या महिलेने मिळवला आहे. नाशिकच्या सिटीलिंक बससेवेत त्या रुजू झाल्या आहेत.

- Advertisement -

स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाचा गाडा चालवणारी कर्तबगार महिला म्हणून नावलौकिक कमावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. मीनाचे पितृछत्र ती पाचवीला असतानाच हिरावले गेले. वडील बबन दादा कापसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. 1999 पासून आई तुळसाबाई कापसे यांनीच सांभाळ केला. या काळात मामा सदाशिव बोडके यांनी वाहन चालवण्यास कधीही नकार दिला नाही. त्यांच्या प्रोेत्साहनामुळे कधी ट्रॅक्टर, कधी बैलगाडा, कधी दुचाकी अशा प्रत्येक वाहनवर स्वार होऊन मीनाने लहानपणीच आपली चुणूक दखवून दिली. त्यामुळे मोठी होताच अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन मीनाने चालक परवानाही काढला.

करोनाकाळात पतीला करोना झाल्यानंतर गावातील एकही वाहनचालक त्यांना दवाखान्यात घेेऊन जाण्याचे धाडस दाखवत नव्हता. त्यावेळी मीनानेे स्वतःच पिकअप चालवत नेऊन त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार केले. त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकपदाची भरती निघाल्यानंतर अर्ज केला असता तेथेेही त्यांची निवड झाली. तीन महिन्यांचे प्रशिक्षण असताना अवघ्या पंधरा दिवसांतच पूर्ण केले. मात्र त्या घरी आल्यानंतर आप्तस्वकियांंच्या प्रेमळ विरोधामुळे त्या पुन्हा मुंबईला जाऊ शकल्या नाही. त्यामुळे बसचालक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. त्यामुळे मीनाबाई मनस्वी नाराज होत्या. त्यांची नाराजी सासूबाई मुक्ताबाई लांंडगे यांना जाणवत होती.

शेवटी त्यांनीच ‘जा बाई चालक व्हायचं तर होऊनच जा’ असे म्हणून जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर नाशिकच्या सिटीलिंक बससेवेत त्या रुजू झाल्या. जिल्ह्यात पहिल्या महिला बसचालक झाल्यानंतर नाशिककरांचा पावलोपावली जिव्हाळा त्यांंना जाणवत आहे. ज्या रिक्षाचालकांबद्दल इतर चालक तक्रारी करतात त्याच रिक्षाचालकांकडून मीना लांडगे यांना अतिशय चांगला अनुभव येत आहे. मामांचे प्रोत्साहन, सासूबाईंचे पाठबळ यामुळे आपले बसचालक होण्याचे स्वप्न साकार झाले, असे लांडगे यांनी ‘देशदूत’शी बोलताना स्पष्ट केले.

नायगाव येथे ड्युटीवर आल्या असता त्यांच्यासह वाहक दीपाली कटारे यांचा पोलीसपाटील संघटना जिल्हाध्यक्ष अरुण पाटील बोडके, मारुती बांगर, शिवनाथ बिरारी यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचा उत्साह द्विगुणीत केला. आजपर्यंत महिला कंडक्टर झाल्या. मात्र, चालकपदी पुरुषांंची मक्तेदारी होती, ती मीना लांंडगे यांनी मोडीत काढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या