Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्याची आज आढावा बैठक

जिल्ह्याची आज आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाकाळात आढावा बैठक ( Review Meeting ) दर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली जात होती. गेल्या अनेक दिवसांच्या खंडानंतर आज (दि 18) जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Newly appointed Collector Gangatharan d. )यांच्या उपस्थितीत ही पहिलीच बैठक आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय (Medical College of Maharashtra University of Health Sciences ) मंजूर होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे. याबाबत महत्वपूर्ण चर्चा बैठकीत होणार आहे.

याप्रसंगी कुलसचिव कालिदास चव्हाण यांच्यासह अधिकारीवर्ग बैठकीला उपस्थित राहणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal )यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीला नूतन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच उपस्थित राहणार असल्याने बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बैठकीत लासलगाव बाह्यवळण रस्ता भूसंपादनावर अंमल केला जाणार आहे. जलसंपदा विभागाकडील विविध प्रलंबित मुद्यांवरदेखील चर्चा होणार आहे. करोनाची रुग्णसंख्या पहिल्यांदाच 10 पेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे करोनाचे जिल्ह्यातील निर्बंध कमी होतील का? याबाबतदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

निर्बंध शिथिलतेवर निर्णय?

नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी शासनाला पत्र लिहिले आहे. नाशिकमधील करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे निर्बंध शिथिल करावेत, अशी विनंती त्या पत्रात केली आहे. त्यावरसुद्धा बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या