Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा हिवताप अधिकारी व दोन आरोग्य सेवक 'एसीबी'च्या जाळ्यात

जिल्हा हिवताप अधिकारी व दोन आरोग्य सेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दोन दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांना तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा अँटी करप्शन ब्युरोने धडाकेबाज कामगिरी करत जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसह दोघांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

या यशस्वी सापळा कारवाईत वैशाली दगडू पाटील (वय- 49 वर्ष, जिल्हा हिवताप अधिकारी , नाशिक, वर्ग 02,रा.स्टेटस रेसिडेन्सी गंगापूर,नाशिक), संजय रामू राव (वय-46 वर्ष, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, नाशिक,वर्ग 03,रा. पाथर्डी फाटा, नाशिक) व कैलास गंगाधर शिंदे (वय-47 वर्ष, आरोग्य सेवक, जिल्हा हिवताप विभाग, नाशिक,वर्ग 03,रा. पांडव नगरी, नाशिक) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

तक्रारदार हे आजारी असल्याने ते वैद्यकीय रजेवरून हजर झाल्यानंतर त्यांचा पगार काढून देण्याचे मोबदल्यात जिल्हा हिवताप अधिकारी, नाशिक वैशाली पाटील यांनी सोमवारी (दि.15) 10 हजार रुपये लाचेची मागणी करून ही रक्कम स्वीकारन्यास प्रोत्साहन दिले. आरोग्य सेवक हिवताप नाशिक संजय रामू राव यांनी 10 हजार रुपये लाचेची मागणी करून आज कैलास गंगाधर शिंदे, यांना स्वीकारण्यास सांगितले. शिंदे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

ही कामगिरी अँटी करप्शन ब्युरोच्या अधीक्षिका शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक साधना इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पो. हवा.सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, प्रकाश डोंगरे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या