Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारेमडेसिवीरसाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष

रेमडेसिवीरसाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष

मुंबई । प्रतिनिधी

करोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखला जाऊन त्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

- Advertisement -

राज्यात करोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. त्यात खासगी दुकानदार अव्वाच्या सव्वा किमतीने इंजेक्शन विकत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अशा औषध दुकानांवर कारवाईही करण्यात आली आहे. मात्र आता जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षात रेमडेसिवीरबाबत तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत.

या तक्रारीचे निवारण स्थानिक अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयामार्फत केले जाईल. जिल्हा स्तरावर एक तांत्रिक समिती गठीत करुन त्यामार्फत विशिष्ट पद्धतीने खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा उपयोग व्यवस्थित होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. रेमडेसिवीरची गरज भासल्यास राज्य स्तरावरील एफडीएच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क करुन कारवाई केली जाणार आहे.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन निर्मिती कंपन्यांशी नुकतीच बैठक घेतली. त्यात रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक आणि काळा बाजार होऊ नये म्हणून इंजेक्शनवरील एमआरपी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या